शेतीच्या वादावरून चुलत भावंडांत मारामारी; एक ठार तर दोघे जखमी

November 21,2020

शेतीच्या वादावरून चुलत भावांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू तर इतर दोघे जखमी झाल्याची घटना रिसोड तालुक्यातील कवठा येथे  घडली. रवी सरनाईक असे मृतकाचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून तीनही आरोपी फरार आहेत. कवठाय ेथील अनिता सरनाईक यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची गावालगत दीड एकर शेती आहे. शेजारीच नारायणराव सरनाईक यांचे शेत आहे. ते फिर्यादीचे चुलत सासरे आहेत. सदर शेती त्यांचा मुलगा तथा चुलत दीर राजू सरनाईक हे करतात. राजू नेहमीच शेतीच्या कारणावरून शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देत होता. घटनेच्या दिवशी  त्याने घरी येऊन शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी समजावून सांगत असताना त्याने काहीही न ऐका दोन सहकारी गणेश सावसुंदर व गोपाल कोल्ल्हिे यांच्या मदतीने मारहाण केली. यावेळी फिर्यादीसह दीर, सासरे यांना मारहाण करण्यात आली. गावकर्‍यांनी भांडण सोडविले. मात्र तोपर्यंत रवी गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात, त्यानंतर वाशीम येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.