100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या प्रस्तावावर अजूनही ठाम ः ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

November 21,2020

100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या आधीच्या घोषणेवर आपण अजूनही ठाम असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी एका पत्रपरिषदेत स्पष्ट केले. मात्र, लॉकडाऊनच्या काळात आलेल्ल्यिा वाढीव बिलाबाबत माफी वा सवलत देण्यास मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिला.

लॉकडाऊन काळातील वाढीव बिले माफ करणार का या प्रश्‍नात ते म्हणाले की, मीटर रीडिंगप्रमाणे बिले भरली गेलीच पाहिजेत. मागच्या सरकारने कर्जाचा डोंगर उभा करून ठेवला आहे. त्यामुळे आजची स्थिती वीजबिल माफीसारखी नाही. आतापर्यंत 69 टक्के ग्राहकांनी बिले भरली आहेत. उर्वरित 31 टक्के डिसेंबर जानेवारीपर्यंत भरतील.

ऊर्जा विभागो 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याबाबत नेमलेल्या अभ्यासगटाचा अहवाल कोरोनामुळे आला नाही. पण ही वीज माफ केल्याचे त्यांनी सांगितले.