देशभरात ५ हजार कोम्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारण्याची तयारी

November 24,2020

नवी दिल्ली : २४ नोव्हेंबर - देशात स्वस्त आणि स्वच्छ इंधन देण्यासाठी आता पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय एका विशेष उपक्रमांवर काम करत आहे. या उपक्रमांतर्गत दोन लाख कोटी खर्च करून देशभरात पाच हजार कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारण्याची तयारी आहे. या प्रकल्पांमध्ये २0२३-२४ सालापयर्ंत पिकांच्या कचर्याच्या सहाय्याने इंधन तयार केले जाईल. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशात स्वस्त आणि स्वच्छ वाहतुकीच्या इंधनासाठी अदानी गॅस आणि टॉरंट गॅस सोबत करार झाला आहे. या कंपन्या ९00 कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पांची उभारणी करणार आहेत. केंद्र सरकारच्या सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टुवर्डस अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन ( एसएटीएटी) उपक्रमांतर्गत २0२३-२४ पयर्ंत देशभरात पाच हजार सीबीजी प्रकल्प उभारले जातील. या माध्यमातून एकूण १५ मिलियन टन उत्पादन लक्ष्य ठेवण्यात आल्याचे अधिकृत निवेदनात सांगण्यात आले आहे.

एसएटीएटीसाठी आम्ही एक रोडमॅप तयार केला आहे. याआधीच ६00 सीबीजी प्रकल्पांसाठी लेटर ऑफ इंटेंट जारी केले आहे. यासह ९00 गॅस प्रकल्पांसाठी सहमती करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. सध्या एकूण १,५00 सीबीजी प्लांट्स विविध टप्प्यात आहेत, असे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. याचबरोबर, या ६00 सीबीजी प्लांट्समध्ये एकूण ३0,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी आहे. तसेच एकूण ५,000 सीबीजी प्लांट्सवर सुमारे दोन लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. या सीबीजी प्लांट्समध्ये तयार होणार्या गॅसचा वापर ऑटोमोबाईलमध्ये इंधन म्हणून करण्यात येणार आहे. देशातील इंधन आयात बिलामध्ये एक लाख कोटी रुपयांपयर्ंत कमी करण्याची क्षमता बायो इंधनमध्ये आहे. एसएटीएटी उपक्रमाद्वारे नगरपालिका तसेच वन व कृषी क्षेत्राच्या कचर्याच्या सहाय्याने गॅस निर्मिती केली जाईल. यामध्ये, पशुसंवर्धन आणि सागरी कचरा देखील गॅस तयार करण्यासाठी वापरला जाईल.