नामनिर्देशित आमदार नियुक्तीला उशीर का? - राजू शेट्टी यांचा राज्यपालांना सवाल

November 24,2020

पुणे : २४ नोव्हेंबर - राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर अजूनही शिक्कामोर्तब नाही. ही यादी जाहीर करण्याबाबत राज्यपालांकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी केला आहे. आता त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उडी घेतली आहे. नामनिर्देशित आमदार नियुक्तीला विलंब का, असा थेट सवाल राजू शेट्टी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केला आहे.

राजू शेट्टी म्हणाले, विधान परिषदेच्या १२ जागांसाठी आम्ही सर्व उमेदवार राज्यघटने निर्धारित केलेल्या निकषात बसत असतानाही राज्यपालांकडून का विलंब केला जात आहे, हे कोडं उलगडत नाही. त्यामुळे यामागे काही राजकारण आहे का, हेही तपासले पाहिजे, अशी शंका देशी राजू शेट्टी यांनी उपस्थित केली आहे. राष्ट्रपतीकडून नामनिर्देशित सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतात, मग राज्यपालांकडून विधान परिषदेच्या १२ सदस्यांना विलंब का होत आहे, असेही राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले आहे.