गंगा एक्सप्रेस वे चे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार

November 24,2020

वाराणसी : २४ नोव्हेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी ३0 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीत पोहोचणार आहेत. ते येथे प्रसिद्ध 'गंगा एक्सप्रेस वे' चे उद््घाटन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मोदींच्या पुढाकारामुळे प्रयागराजमधील लोकांना या सहा लेन एक्सप्रेस वेची भेट मिळणार आहे. हरिद्वार ते प्रयागराज हा एक्सप्रेस वे देशातील सर्वात मोठा एक्सप्रेस वे होईल. हा १,0२0 किमी लांबीचा आहे. हा एक्सप्रेसवे तयार करण्यासाठी सुमारे ३७,000 कोटी रुपये खर्च लागणार आहेत. हा प्रकल्प उत्तर प्रदेश सरकारने यावर्षी जानेवारीमध्ये सुरू केला होता.

देशाच्या सर्वात मोठ्या एक्स्प्रेस वेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याआधी सांगितले होते की, ६,५५६ हेक्टर क्षेत्रावरील हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेस वे असेल. हा महामार्गाचा प्रकल्प दोन टप्प्यात विकसित केला जाईल. गंगा एक्स्प्रेस वेच्या पहिल्या टप्प्यात ५९६ किमी लांबी पूर्ण करण्यात येईल आणि मेरठ, ज्योतिबा फुले नगर, हापूर, संभळ, बदायूं, शाहजहांपूर, फरुर्खाबाद, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगड आणि प्रयागराज या जिल्ह्य़ांना जोडेल. यात पाच मोठे पूल, आठ रोड-ओव्हरब्रिज आणि १८ उड्डाणपूल असतील. 

या द्रुतगती मार्गावर सहा लेन, आठ लेनचा विस्तार अत्यंत योग्य व संपूर्ण प्रवेश नियंत्रित द्रुतमार्ग असेल. हा रस्ता पश्चिम यूपीला पूर्व यूपीला जोडेल. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी एकूण ३७,३५0 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, त्यापैकी ९,५00 कोटी रुपये जमीन अधिग्रहणावर आणि २४,0९१ रुपये बांधकामांच्या कामांवर खर्च करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प ७0 टक्के कर्ज आणि ३0 टक्के इक्विटीद्वारे अनुदानीत केला जाईल. 

हा एक्स्प्रेस वे मेरठमधील शंकरपूर गावाजवळील एनएच २३५ पासून सुरू होईल आणि प्रयागराज जिल्ह्य़ातील सोरांवजवळ एनएच -३३0 पयर्ंत संपेल. एक्सप्रेसवेच्या दुसर्या टप्प्याअंतर्गत तिगरी ते उत्तर प्रदेश-उत्तराखंड सीमेपयर्ंत ११0 किमी लाब रस्त्याचा विस्तार केला जाईल आणि प्रयागराजपासून बलियापयर्ंत ३१४ किमीचा आणखी एक रस्ता तयार करण्यात येईल. गंगा एक्सप्रेसवेची विशेष बाब म्हणजे हा राज्यातील अन्य एक्सप्रेसवेला लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वे, पूर्वांचल एक्सप्रेसवे आणि बलिया लिंक एक्सप्रेसवेच्या माध्यमातून जोडला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश सरकारने गंगा एक्सप्रेसवेच्या किनार्यावर मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण अभियान सुरू करण्याची योजना तयार केली आहे.