शहीद संग्राम पाटीलच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

November 24,2020

कोल्हापूर : २४ नोव्हेंबर - जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील नौसेरा सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात कोल्हापूर जिलतील निगवे खालसा (ता. करवीर) येथील बहादूर वीर जवान हवालदार संग्राम शिवाजी पाटील (३७) शहीद झाले होते. सकाळी सात वाजता त्यांचे पार्शिव त्यांच्या मूळ गावी मूळगावी निगवे खालसा येथे आणण्यात आले. त्यानंतर गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. वंदे मातरम, शहीद जवान संग्राम पाटील अमर रहे! अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. चनिशेटी विद्यालयासमोर असलेल्या क्रीडा मैदानात शहीद जवान संग्राम पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सुमारे २५ हजारांचा जनसमुदायक उपस्थित होता. सार्शू नयनांनी वीर जवानांना अखेरचा निरोप देण्यात आला.

दरम्यान, गावाला जोडणार्या मुख्य रस्त्यापासून गावात येईपयर्ंत सर्व ठिकाणी पाकिस्तानचा निषेध करणारे वीर जवान अमर रहे च्या घोषणा असणारे तसेच संग्राम शिवाजी पाटील यांचे छायाचित्र असणारे मोठे फलक लावण्यात आले आहेत. गावात आजही लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला आहे.