अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारण्यासाठी विद्यमान सरकारकडून पैसे नाही

November 24,2020

नागपूर : २४ नोव्हेंबर - माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने सोलापूर विद्यापीठाचे नामकरण -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे करण्यात आले. पण पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या कार्याची स्मृती जोपासण्याच्या दृष्टीने, अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा विद्यापीठ परिसरात उभारण्याचे ठरले. मात्र यानंतर याबाबत काहीही कार्यवाही झाली नाही. प्रश्न केवळ निधी चा नसून, विद्यमान सरकारच्या मानसिकतेचा आहे. सरकारच्या या कृतीचा मी आणि धनगर समाज संघर्ष समिती निषेध करते आणि यावर तात्काळ कार्यवाही न केल्यास यासाठी आंदोलन करण्यावाचून पर्याय राहणार नाही असा इशारा एका पत्रपरिषदे खा. डॉ. विकास महात्मे यांनी दिला.

अहल्यादेवींच्या पुतळ्यासाठी अंदाजे 2. 5 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यातील 1. 5 कोटी राज्य सरकार तर 1 कोटीचा निधी सोलापूर विद्यापीठ पुरवेल असे बैठकीत ठरले होते. पण आजपावेतो याबाबत काहीही पावले उचलल्या गेली नाहीत. 19 नोव्हेंबर मंत्री उदय सामंत यांना स्मरण पत्र देण्यात आले आहे. खासदार महात्मे पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्मारक उभारणी समितीचे स‘ागार सदस्य आहेत. पुण्यश्लोक अहल्यामातेच्या पुतळ्यासाठी आपल्या खासदार निधीतून 1 कोटी रुपये देण्याची इच्छा राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी व्यक्त केली आहे. तसेच हा पुतळा म्हणजे धनगर समाजासाठी अतिशय जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील विषय आहे. गरीब धनगर समाज बांधव पोटाला चिमटा घेऊनही या पुतळ्यासाठी निधी उभारण्यास तयार आहेत. मात्र शासन म्हणते कि निधी उभारण्याची गरज नाही आणि स्वतः निधी काही देत नाही. त्यामुळे या सरकारच्या हेतू वरच प्रश्न चिन्ह आहे असेही यावेळी डॉ. महात्मे म्हणाले, पत्रपरिषदेला हरीश खुजे, महादेव पातोंड,दीपक टापरे, सौ वंदना बरडे उपस्थित होते.