वर्धेत साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

November 24,2020

वर्धा: २४ नोव्हेंबर - जामनी येथील मानस अँग्रो इंडस्ट्रीज अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि.युनिट क्र.3 या साखर कारखान्याचा 11 वा गळीत हंगाम शुभारंभ आज 23 रोजी खा. रामदास तडस व निखील गडकरी यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकूण करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सारंग गडकरी, आ. रामदास आंबटकर, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव राजेश बकाणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी समय बनसोड, माधव कोटस्थाने, अनिल जोशी, दीपक बावणकर, विनोद लाखे, सोमराज तेलखेडे, स्वप्नील भोयर, राजू राठी, गुंड्डू कावळे, प्रशांत बुर्ले, अशोक कलोडे, मदनीचे सरपंच अभय ढोकणे, जामनीचे सरपंच प्रिती गव्हाळे, अनिल येलोरे यांची उपस्थिती होती.

निखील गडकरी यांच्या हस्ते गव्हाण व काट्याचे पुजन करण्यात आल्यावर कामठी येथील उत्कृष्ठ ऊस उत्पादक शेतकरी पंकज हाडके या शेतकर्याचा आ. रामदास आंबटकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अंदाजे 2 लाख मे.टन ऊसाचे गाळप या साखर कारखान्याचे होणार असुन यासाठी ऊस तोडणीसाठी लातूर, बीड, पाथर्डी व पुसद येथून ऊस तोड यंत्रणा हजर झालेली आहे.

 यावेळी उप महाव्यवस्थापक जयंत ढगे, मुख्य अभियंता किशोर देवढे, प्रफुल मुडे, उत्पादन महाव्यवस्थापक विलास कोटंबकर, किशोर हुलके, दिलीप बोडखे, संदीप गोवीलकर, श्रीराम झाडे, राम काळे, प्रकाश अडसुळे, प्रमोद राऊत, अतुल मडगे आदींची उपस्थिती होती.