अवैध मोहफूल अड्ड्यावर पोलिसांनी टाकली धाड

November 24,2020

भंडारा : २४ नोव्हेंबर - जवाहरनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध मोहफूल अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखा व जवाहरनगर पोलिसांनी धाडटाकून मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण व पोलिस स्टेशन जवाहरनगरचे सहायक पोलीस निरीक्षक बारसे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लोहारा नाल्याचे काठावर पाहणी केली असता आरोपी अभिमन्यू नीलकंठ उके (४५) रा. पेट्रोलपंप हा प्लास्टिक पिशव्यामध्ये मोहापास भरतांना दिसला. त्याचेकडून १७0 पांढर्या प्लॉस्टीकच्या पिशव्यांमध्ये प्रत्येकी १५ किलो प्रमाणे एकुण ६0 हजार रुपये, दोन प्लास्टिक ड्रम, लहान खाली टिनाचे पिपे ४, जळाऊ लाकडे, असा एकूण ६३ हजार ८00 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. जवाहरनगर पोलिसांनी दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. 

सदर कारवाईजिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण व पोलिस स्टेशन जवाहरनगरचे सहायक पोलिस निरीक्षक बारसे, यांचे अधिनस्त पथकातील पोलिस उपनिरीक्षक तुकाराम गभणे, पोलिस हवालदार मडामे, पोलिस नायक विजय राऊत, देशमुख यांनी केली.