बनावट कागदपत्रे करून शेतजमीन विकणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल, चौघांना अटक

November 24,2020

बुलढाणा : २४ नोव्हेंबर - शेतमालकाचे बनावट आधार कार्ड तयार करून ती शेत जमीन शेतमालकाच्या परस्पर आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून विकत घेणार्या व विकणार्या वाघोळा येथील ७ जणांविरुद्ध सुभाष नामदेव सावळे (वय ४५, ता. यावल, जि. जळगाव) याने दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यातील ४ आरोपींना अटक करून २३ नोव्हेंबरपयर्ंत त्यांना पोलिस कोठडी सुनावली होती. 

याबाबत असे की, सुभाष नामदेव सावळे रा. गावठाण वस्ती, निमगाव, ता. यावल यांची वाघोळा शिवारा २५ आर. शेतजमीन आहे. ही शेतजमीन त्यांना विश्वासात न घेता ते गैरहजर असतांना त्यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड तयार करून आर्थिक फायद्यासाठी सुमनबाई सावळे, दयाराम सावळे, संगिता कावळकर, गोपाल कावळकर, योगेश बावीसआणे सर्व रा. वाघोळा, जयपाल मोरे (रा. हरसोडा), दिनकर पवार सब रजिष्टार दुय्यम निबंधक कार्यालय मलकापूर या ७ जणांनी संगनमत करून संगीता कावळकर हिला दि. १७ ऑगस्ट रोजी मलकापूर खरेदी - विक्री कार्यालयात शेती नावावर करून देत १ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत १८ नोव्हेंबर रोजी फिर्यादी सुभाष नामदेव सावळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी वरील ७ ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून यातील संगिता कावळकर, गोपाल कावळकर , योगेश बाविसआणे व जयपाल मोरे या चौघांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांचा २३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती, आज त्यांना न्यालयासमोर उभे केले. एमसीआर झाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.