२५ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांचे धान खरेदी करा - पालकमंत्र्यांचे आदेश

November 24,2020

गोंदिया : २४ नोव्हेंबर - गोंदिया जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्रावर २५ नोव्हेंबरपयर्ंत शेतकर्यांचे धान खरेदी करण्याचे निर्देश गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी पणन अधिकार्याला दिले. नवीन धान खरेदी केंद्र सुरू करायचे असल्यास तसे प्रस्ताव तातडीने सादर करावे, असेही ते म्हणाले. 

जिल्ह्यातील धान खरेदीचा आढावा ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. आमदार मनोहर चंद्रिकापुरे, सहसराम कोरोटे, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील, प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड, अतुल नेरकर यावेळी उपस्थित होते.

२८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी पणन अधिकारी यांचे कार्यक्षेत्रात ७0 धान खरेदी केंद्रांना व आदिवासी विकास महामंडळाच्या क्षेत्रात ४४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली असतांना २२ नोव्हेंबरपयर्ंत पणन अधिकार्यांनी ४१ केंद्रावर २१ हजार क्विंटल तर आदिवासी विकास महामंडळाने ३ केंद्रावर २ हजार क्विंटल धान खरेदी केले. यामुळे शेतकर्यांचे धान खरेदीविना पडून असून त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, अशा शब्दात पालकमंत्यांनी नाराजी व्यक्त केली. २५ नोव्हेंबरपयर्ंत सर्व केंद्रावर शेतकर्यांच्या धानाची खरेदी सुरू करावी असे निर्देश त्यांनी पणन अधिकार्याला दिले. त्याचप्रमाणे नवीन केंद्रास मंजुरी द्यावयाची झाल्यास तसे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.