अवैधरित्या नेण्यात येणारे सागवान केले जप्त

November 24,2020

गडचिरोली : २४ नोव्हेंबर - आसरअल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या गुमलकोंडा नदी घाटावरुन अवैधरित्या वनसंपत्तीची वाहतूक केली जात असल्या प्रकरणी १७ नग सागवनी लठ्ठे जप्त करण्याची कारवाई रविवारी, रात्रोच्या सुमारास वनविभागाच्या अधिका-यांनी पार पाडली. मात्र यातील वनतस्कर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. वनतस्करांद्वारे सागवानाची तस्करी केल्या जाणार असल्याची गुप्त माहिती मिळताच आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील अधिका-यांनी रविवारी रात्रीच्या सुमारास सापळा रचला होता. गुमल्लकोंडा नदी घाटावर काही तस्कर सागवानाची तस्करी करीत असल्याचे निदर्शनास आले. वनाधिका-यांना बघताच वनतस्कर सागवन सोडून पसार झाले. यावेळी घटनास्थळावरुन १७ नग सागवनी लठ्ठे जप्त करण्यात आले. या सागवनाची किंमत लाखोंच्या घरात असल्याची माहिती आहे.सदर कारवाई आसरअल्लीचे अतिरीक्त वनपरिक्षेत्राधिकारी आर. बी. मडावी यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. वनसाहित्य जप्त करुन वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले. सदर कारवाई वनरक्षक अजय इरकिवार, वनरक्षक राहुल चिचघरे, प्रिती पोटावी, बिसेन ताराम, कन्नाके, प्रितम मडावी, महेश डुबला, यांच्या उपस्थिती पार पडली.