गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा युनिटला मंजुरी

November 24,2020

गोंदिया : २४ नोव्हेंबर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रक्तपेढी केंद्रात प्लाझ्मा फेरेसिस युनिटला मंजुरी देण्यात आली आहे.  येत्या सात दिवसात हे युनिट कार्यान्वित होणार आहे. कोरोनाबाधित रुग्ण यात प्लाझ्मा दान करू शकणार आहेत.  

कोरोना संक्रमणातून मुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर २८ दिवसात रुग्ण प्लाझ्मा डोनेट  करू शकतात. यासाठी संबंधित व्यक्ती १८ ते ६० वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्तीच्या रक्तातून २०० ते ६०० मिली. प्लाझ्मा संबंधित व्यक्तीच्या प्रकृतीचा आढावा घेऊन काढला जाईल, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता  डॉ. नरेश तिरपुडे यांनी दिला आहे. गोंदियातील युनिटसाठी औषधीद्रव्य विभागाचे सचिव सौरव राव, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्य विभागाचे तत्कालीन सचिव डॉ. संजय मुखर्जी यांच्यासह अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.