संतापलेल्या नवऱ्याने बायकोच्या डोक्यात दंडा घातला, नवरा अटकेत

November 24,2020

नागपूर : २४ नोव्हेंबर - घरात आल्याबरोबर पत्नीने कटकट लावल्यामुळे संतापलेल्या नवरोबाने त्याच्या पत्नीला लाकडी दांड्याने मारून  तिचा हात फ्रॅक्चर केला. जरीपटक्यातील मिसळ ले आऊटमधील घडलेली ही घटना अजब असली तरी सत्य आहे.  आरोपीचे नाव कन्हैया ध्रुवदास बागडे (३५) आहे. तो भाजी विकतो. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो मार्केटमध्ये भाजीपाला आणायला गेला.  तेथून तो ११ वाजताच्या दरम्यान घरी आला. घरात शिरताच त्याला त्याच्या मोठ्या मुलीने घरमालक  भाडे मागायला आलं होता, कटकट करून गेला असे सांगितले. तुझी आई देईल घरभाडे, त्यात काय मोठे, असे बागडे म्हणाला. त्यावर बागडेंची पत्नी वर्षा हिने माझ्याकडे पैसे नाहीत, मी कुठून भाडे देऊ, असे म्हणून पतीसोबत वाद घातला. सकाळपासून उपाशीपोटी भाजी आणायला गेल्यानंतर घरी येताच कटकट लागल्याने कन्हैया बागडे संतापला. त्याने रंगाच्या भरात घरातील लाकडी दांडा उचलून पत्नीला मारणे सुरु केले. यात वर्षाच्या हाताला जबर दुखापत झाली. मुलींनी मध्ये पडून बापाला आवरले. वर्षाने जरीपटका पोलीस  ठाण्यात तक्रार दिली.