पगार मागितला म्हणून चाकूने भोसकले

November 24,2020

अकोला : २४ नोव्हेंबर - वेतनाचे पैसे मागण्याकरिता गेले असता, बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या कर्मचाऱ्यास  पोटात चाकू मारून गंभीर जखमी केल्याची घटना काल घडली.

नितीन भारत भागात रा. नंदीपेठ हा बजाज फायनान्स कंपनीमध्ये काम करीत होता. तेव्हा त्याच्या वेतनाचे पैसे मागण्याकरिता  बँक कर्मचारी आशुतोष वानखेडे रा. माळीपुरा वाशीम हल्ली मुक्काम अहिल्याबाई होळकर नगर लोहारी रोड येथे राहत होता. 

नितीन हा वेतनाचे १८ हजार रुपये मागण्याकरिता गेला असता वानखेडे यांनी त्याला सहा हजार रुपये दिले व उरलेले उद्या देतो असे म्हटले तेव्हा  या दोघांमध्ये वादविवाद सुरु झाला. वानखेडे याने त्याच्या घरातून चाकू आणून नितीन याच्या डाव्या कुशीत व मानेवर डाव्या बाजूने  वार केले. व जखमी केले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.