युवतीवर कारमध्ये बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल

November 24,2020

नागपूर : २४ नोव्हेंबर - मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख झालेल्या युवतीवर एका पोलीस कर्मचाऱ्याने कारमध्ये बलात्कार केला . एव्हढेच नव्हे त्याने तिचे मोबाईलवर फोटोसह अश्लील व्हिडीओ तयार करून अडवणूक करीत वेळोवेळी बलात्कार केला. 

या प्रकरणी पीडित युवतीच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रिजवान  उस्मान शेख (२८) रा. पीसी क्वार्टर, पोलीस लाईन टाकळी असे आरोपी पोलिसांचे नाव आहे. 

प्राप्त माहितीनुसार पीडित २७ वर्षीय शीना (बदललेले नाव) ही उच्चशिक्षित तरुणी आहे. आरोपी पोलीस कर्मचारी रिजवान शेख  याच्यासोबत एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिची ओळख झाली. २०१४ मध्ये ती शिक्षण घेत असताना त्याने शिनाला  वर्धा रोडवर  भेटायला बोलावले. दरम्यान तिला कारमध्ये बसवून जंगलाच्या दिशेने नेले. वारीमध्ये तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.  बलात्कार करताना मोबाईलने फोटो आणि व्हिडीओ काढले. त्यानंतर सोशल निडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.  आणि आई-वडिलांना पोस्टाने फोटो पाठवेन अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर त्याने तिला लग्नाचे आमिषही दाखविले.  दरम्यान रिजवानने तिला बाहेरगावी ट्रीपवर जाण्यासाठी बळजबरी केली. 

आईवडिलांना खोटे सांगून ती रिजवानसोबत पुणे, जबलपूर आणि अन्य ठिकाणी  फिरायला गेली. शिवाय पोलीस क्वार्टरमध्ये नेऊनही त्याने  शिनाचे लैंगिक शोषण केले. गेल्या सहा वर्षांपासून लग्न न करता त्याने अचानक एका दुसऱ्या मुलीशी  गुपचूप साक्षगंध उरकला. त्याने शीनाची कारही  बळकावली होती. वेळोवेळी तिला मारहाणही केली. शेवटी संतप्त शीनाने गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.