७० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ५५ लाख रुपये रोख अमरावतीतून जप्त

November 24,2020

नागपूर : २४ नोव्हेंबर - सत्तर कोटी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या १० आरोपींना नागपूरच्या प्रतापनगर पोलिसांनी अटक केली असून आरोपींकडून आज ५५ लाख ४७ हजार ८०० रुपये अमरावती येथून जप्त केल्याची माहिती पोलीस उपयुक्त नुरुल हसन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तस्सेच आरोपींकडून 

भोळ्या लोकांना श्रीमंतीचे स्वप्न विकून कोट्यधीश झालेल्या शक्कलबाजाकडून प्रतापनगर पोलिसांनी ५५ लाख रुपये जप्त केले. त्याच बरोबर त्याचे खाजगी बँक खाते गोठवून ४८ लाख रुपये थांबविले. अशा प्रकारे एक कोटी ३ लाख ८२ हजार ४३२  रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. कोट्यवधींचा गुंतवणूक प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश येत आहे. या प्रकरणात १५ हजार गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली असून ही रक्कम १०० कोटीच्या घरात जात आहे.

विजय गुरनुले (३९) असे या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. यासोबत जीवनदास डंडारे, अतुल मेश्राम, रमेश बिसेन, अतुल मेश्राम, अविनश महाडोले, राजू माहुर्ले, श्रीकांत निकुरे, ज्ञानेश्वर बावणे आणि देवेंद्र गजभिये याच्यासह आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यातील काही आरोपींची पोलीस कोठडी संपली  असून काही पोलिस कोठडीत आहेत. आणखी कोट्यवधींची रक्कम जप्त करायची आहे. आतापर्यंत तक्रारदारांची संख्या ३० झाली आहे. हे तर नागपुरातील आहेत.तसेच  विविध राज्यातील हजारो लोकांना त्याने गंडा घातला आहे. त्यामुळे तक्रारदारांची संख्या वाढतीवर आहे. आरोपींनी आपल्या नातेवाईकाच्या अमरावती येथील निवासस्थानी तीन गड्ड्यांमध्ये ५५ लाख रुपये गाडून ठेवले होते. हि रक्कम पोलीस पथकाने अमरावती येथे जाऊन जप्त केली. तसेच देवेंद्र गजभिये यांच्याकडून २६ लाख व ४ लाखाची एफडी असे ३० लाख रुपये गोठविण्यात आले आहे. तर मुख्य आरोपी विजय गुरनले याच्या पत्नीच्या बँक खात्यामधून ३ लाख २८ हजार १०८ तर इतर आरोपींच्या बँक खात्यामधून १० लाख रुपये गोठविण्यात आले आहे. विजय गुरनुले याने ४० लाख रुपये किमतीची १० एकर जमीन विकत घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. 

 विजय आणि त्याचे साथीदार जीवनदास, अतुल आणि रमेश यांनी त्रिमुर्ती नगरातील मंगलमुर्ती चौकात मेट्रो व्हिजन बिल्डकॉम व रिअर ट्रेड कंपनी या नावाने २०१५ मध्ये कार्यालय सुरू केले. व्यवसाय वाढत गेल्यानंतर रिअल ट्रेड आणि मेट्रो क्वॉइन या दोन कंपन्या २०२० साली सुरू केल्या. सुरुवातीला भूखंड विक्रीचा व्यवसाय केला. या व्यवसायातही फसवणूक केली. नंतर रिअल ट्रेडच्या माध्यमातून लोकांना गुंवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणुकीतील रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यात येईल. त्याबदल्यात चांगला नफा देण्याचे प्रलोभन त्याने दिले.

 त्यांच्याकडून कोट्यवधींची रक्कम हडपली आणि कार्यालय बंद केले. त्याने आपल्या कंपनीचे देशभरात जाळे पसरवले. १५ हजार गुंतवणूकदार गोळा करून त्यांच्याकडून ७० कोटी उकळले. पोलिसांनी कंपनीचे चार बँक खाते गोठविले आहेत. त्याच प्रमाणे विजयचे खाजगी बँक खाते गोठवून ४८ लाख रुपये थांबविले आणि ५५ लाख रुपये जप्त केले आहेत. ही रक्कम १०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनात वपोनि बी.एस. खणदाळे, उपनि व्ही.वाय. नांदगावे, उपनि एस.जे. केंद्रे, अनिल ब्राह्मणकर, मनोज नागमोते, मनोज निमजे, स्वप्नील करंडे, अतुल तलमले आणि मिलिंद  मेश्राम यांनी तपास कार्यात सहकार्य केले.