मास्क न लावणा-या १६९ नागरिकांकडून दंड वसूली

November 24,2020

नागपूर : २४ नोव्हेंबर - नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (२४ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १६९ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ८४ हजार ५०० रुपयांचा  दंड  वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी २१११६ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ८९,१७,०००/- चा दंड वसूल केला आहे.

मंगळवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २०, धरमपेठ झोन अंतर्गत ३४, हनुमाननगर झोन अंतर्गत ३३, धंतोली झोन अंतर्गत १४, नेहरुनगर झोन अंतर्गत १०, गांधीबाग झोन अंतर्गत ८, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ११, लकडगंज झोन अंतर्गत ८, आशीनगर झोन अंतर्गत १४, मंगळवारी झोन अंतर्गत १३ आणि मनपा मुख्यालयातील ४ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत १५६४६ बेजबाबदार नागरिकांकडून रु ७८ लक्ष २३ हजार वसूल करण्यात आले आहे.