शहरातील प्रतिष्टीत व्यक्ती आता मेट्रोचे अँम्बेसेडर

November 24,2020

नागपूर : २४ नोव्हेंबर - मेट्रो सेवेचा जास्तीत जास्ती नागरिकांनी उपयोग करावा, स्वतःचे वाहन शक्य असेल तेवढे कमी वापरून दैनंदिन परिवहन साधन म्हणून मेट्रो आणि फिडर सर्विसचा वापर करावा या उद्देश्याने महा मेट्रोने शहरातील व स्टेशन परिसरातील प्रतिष्टीत व्यक्तीना महा मेट्रोच्या स्टेशनचे अँम्बेसेडर म्हणून महा मेट्रोशी जोडले आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून प्रवाश्याना स्टेशन परिसरातून व इतर ठिकाणाहून मेट्रो स्टेशन पर्यंत येण्याकरिता फिडर सर्विसच्या रूपात आपली बस सेवा सुरु करण्यात आली आहे.

महा मेट्रोशी जोडण्यात आलेले अँम्बेसेडर शहरातील प्रतिष्टीत व्यक्तीचे शैक्षणिक,औद्योगिक तसेच सामाजिक कार्यात मोलाचा वाटा आहे तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक त्यांच्याशी जुळले आहेत ज्यामुळे सदर व्यक्ती नागरिकांना प्रोत्साहन करतील व मेट्रोचा उपयोग करण्यास प्रेरित करतील हा मानस महा मेट्रोने योजिला आहे. महा मेट्रोने प्रत्येक स्टेशन करता एक अँम्बेसेडर जोडले आहे व अँम्बेसेडरशी महा मेट्रोचे अधिकारी नियमित पणे समन्वय साधून योग्यपणे अंबलबजावणी करतील. 

स्टेशन अँम्बेसेडरचा मुख्य उद्देश जास्तीत जास्ती नागरिकांना मेट्रो रेल प्रकल्पाशी जोडून सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्ती उपयोग करावा. स्टेशन अँम्बेसेडरची मुळ संकल्पना महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांची असून सर्वांच्या सहभागानी शहराला उत्तम दर्ज्याचे सुरक्षित व पर्यावरणपूरक वाहतूकचे साधन उपलब्ध व्हावे तसेच जास्तीत जास्ती नागरिकांनी मेट्रो सेवेचा उपयोग करावा असे आवाहन डॉ. दीक्षित यांनी नागरिकांना केले.