अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे दोन आरोपी अटकेत, ३.६० लाखाचा मुद्देमाल जप्त

November 26,2020

अमरावती : २६ नोव्हेंबर - अवैधरित्या जनावरांची वाहतुक करणार्या वाहनाला पकडल्याची कारवाई चांदूर रेल्वे पोलिसांनी सिटी पॉईंटजवळ ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात केली. यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असुन 3.60 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाटा एस गाडी क्र. एमएच 27 बीएक्स 3397 मध्ये जनावरांची अवैधरित्या वाहतुक होत असल्याची माहिती चांदूर रेल्वे पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सदर वाहनाला पकडले असता त्यामध्ये अवैधरित्या व विनापरवाना तसेच जनावरांची काळजी न घेता वाहनामध्ये जनावरे कोंबुन वाहून नेताना मिळाले. यामुळे पोलिसांनी 4 बैल किंमत अंदाजे 1 लाख 60 हजार व वाहन किंमत 2 लाख रूपये असा एकुण 3 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी मो. रीजवान मो. इरफान (26) रा. मनभा जि. वाशीम व जितेंद्र वामनराव वाघमारे (36) रा. शहापुर ता. नांदगाव खंडेश्वर यांना अटक केली. सदर जनावरे मनभाकडे घेऊन चालले होते. आरोपींविरूध्द कलम 5 (अ), 9 प्राणी संरक्षण कायदा, 11 (1) (ड) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल दाखल करण्यात आला.