कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ३६ गोवंशाची केली सुटका

November 26,2020

अमरावती : २६ नोव्हेंबर - मध्यप्रदेश येथून तिवसा मार्गे अमरावतीकडे कत्तलीच्या उद्देशाने मालवाहू ट्रकमध्ये जनावरांना निर्दयतेने कोंबून नेण्यात येणार्या ट्रकला तिवसा पोलिसांनी बसस्थानकजवळ पकडून त्यातील 36 गोवंशाची सुटका केली. सकाळी एमएच 28,एस 0311 या मालवाहू ट्रकमध्ये एकूण 36 गोवंशाना निर्दयतेने कोंबून कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येत असल्याची माहिती तिवसा पोलिसांना मिळताच त्यांनी तिवसा बसस्थानक जवळ सापळा रचून सदर ट्रक पकडला. त्यातील 36 जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने गोरक्षण संस्थेत रवानगी करण्यात आली असून 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ट्रकसह एकूण 18 लाख 60 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शना पोलिस निरीक्षक रिता उईके यांचे नेतृत्वात पीएसआय शैलेश मस्के, पीएसआय राजेश पांडे, पोकॉ दीपक सोनाळेकर यांनी ही कारवाई केली.