मळणी करण्यासाठी शेतात रचून ठेवलेले धान पुंजणे जाळले

November 26,2020

गोंदिया : २६ नोव्हेंबर - दीड एकरातील धानाची कापणी करून मळणी करण्यासाठी शेतातच रचून ठेवलेल्या धान पुंजणे जाळल्याची घटना  सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास सडक अजुर्नी तालुक्यातील मालीजुंगा (पांढरी) येथील शेतशिवारात उघडकीस आली. घटनेत शेतकरी रामेश्वर खुणे रा. लेंडेझरी/मुरपार यांचे ७0 हजार रुपायांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

रामेश्वर खुणे यांची मालीजुंगा येथे दीड ऐकर शेती आहे. त्यांनी संपुर्ण क्षेत्रात हायब्रिड ८४३३ या धान वाणाची लागवड केली होती. निसगार्ने साथ दिल्याने धानाचे पिकही उत्तम होते. आज ते सकाळी पहाणी करण्यासाठी शेतात गेले असता धान पुंजणे धगधगत असल्याचे दिसले. त्यांनी गावकड्ढयांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला तापयर्ंत संपूर्ण पीक जळून खाक झाले होते. घटनेची माहिती धानोरी साझाचे तलाठी यांना देण्यात आली. माहिती मिळताच तलाठी मनोज डोये यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी सल्लू पठाण, धनराज कापगते, सुरेश कापगते, चंद्रभान कापगते यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थीत होते. शासनाने रामेश्वर खुणे यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे