महावितरणची किमती अल्युमिनिअमची तर अज्ञात चोरट्याने पळवली

November 26,2020

बुलढाणा : २६ नोव्हेंबर - महावितरणची २५ हजार रुपये किंमतीची अँल्युमिनियम तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना हिंगणा कारेगाव शिवारात उघडकीस आली आहे. महावितरणच्या कोलोरी सबस्टेशनचे टेक्नीशियन योगेश रामकृष्ण काळणे (२९) यांनी ग्रामीण पोस्टेला तक्रार दिली की, हिंगणा कारेगाव शिवारातील विद्युत खांबावरील ४५0 फूट लांबीची अँल्युमिनियम तार किंमत २४ हजार ३00 रुपये २ ते २0 नोव्हेंबरदरम्यान आत चोरटट्यांनी संपास केल्याची माहिती हिंगणा कारेगाव येथील गोपाळ गुणवंतराव देशमुख यांनी फोनव्दारे दिली.

त्यामुळे घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली असता तार कोणीतरी अशात चोरट्याने लंपास केल्याचे निदर्शनास आले. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम १३६ भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.