विद्युत प्रवाहाने बिबट्याची हत्या केल्याचे झाले उघड

November 26,2020

गोंदिया : २६ नोव्हेंबर - बिबट वाघाचे कातडे विकण्याच्या तयारीत असणार्या तीन आरोपींना १८ नोव्हेंबर च्या रात्री नवेगाव बांध पोलिसांनी अटक केली होती. यातील मुख्य आरोपी देविदास दादू मरस्कोल्हे वय ५२ वर्षे राहणार झाडगाव जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून विद्युत प्रवाहाने बिबट्या वाघाची हत्या करण्यात आली असून, बिबट्याच्या अवयवांची परस्पर विल्हेवाट आपल्या साथीदाराच्या सहाय्याने लावल्याचे वन विभागाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. १९ नोव्हेंबरला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्या न्यायालयात या तिघांना हजर करून २५ नोव्हेंबर पयर्ंत वन कोठडी मागण्यात आली होती. वन विभागाच्या तपासात पुन्हा पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नवेगावबांध बिबट चामडे व शिकार प्रकरण यातील नव्याने अटक झालेल्या पाच आरोपी चे नावे.गोवर्धन सुरेश सिंधीमेर्शाम वय ३0 वर्षे राहणार सानगाव, महेंद्र काशिराम मोहनकर वय २७ वर्षे राहणार सानगाव, रामाजी रूपराम खेडकर वय ४५ वर्षे राहणार सानगडी, वसंता शालिकराम खेडकर वय ५0 वर्षे राहणार झाडगाव सर्व भंडारा जिल्हा, महेश धनपाल घरडे वय ३0 वर्षे राहणार झांजिया या पाच आरोपींना तपासा अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी देविदास मरस्कोल्हे हा आहे. याने आपल्या साथीदारांसह वाघाची हत्या करून त्याचे चामडे व इतर अवयवांची परस्पर विल्हेवाट लावली. अशी माहिती सूत्रांनी दिली.

बिबट वाघाचे कातडे विकण्याच्या तयारीत असणार्या तीन आरोपींना अटक नवेगावबांध पोलिसांनी दिनांक १८ नोव्हेंबर ला उशिरा रात्री केली होती. अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी अतुल कुलकर्णी यांना गुप्त बातमीदाराकडून काही लोक हे बिबट्या वाघाची कातडी पाच लाख रुपयात विक्री करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील सानगडी येथून भिवखिडकी शिवारात आलेले आहेत. अशी माहिती मिळाली. या माहितीची खात्री करून नवेगावबांध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी एक पथक तयार करून छापा टाकुन पोलिसांनी एक डमी ग्राहक तयार करून बिबट्या वाघाची कातडी पाच लाख रुपयांत खरेदी करण्याची बोलणी केली. त्यानंतर आरोपींनी भिवखिडकी शिवारातील लांजेवार राईस मिल जवळील एका शेतात तीन इसमांनी बिबट्या वाघाची कातडी, काळीज, गुडघा, दात, पंजे हे अवयव स्वत:जवळ विक्री करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवले होते खरेदीची बोलणी झाल्यावर पोलिसांनी छापा टाकून तीन आरोपींना अटक केली होती. देविदास दागो मरस्कोल्हे वय ५२ वर्षे राहणार झाडगाव जिल्हा भंडारा, मंगेश केशव गायधने वय ४४ वर्षे राहणार पोहरा तालुका लाखणी, रजनी पुरुषोत्तम पोगडे वय ३२ वर्षे रा. सानगडी तालुका साकोली सर्व जिल्हा भंडारा या तीन आरोपींना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातील बिबट कातडे व अवयव घटनास्थळी पंचनामा करून जप्त करण्यात आली आहेत. सदर प्रकरण पोलिसांनी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक या कार्यालयाकडे सोपविले आहे. या तिन्ही आरोपींवर वन्य प्राणी संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन सहाय्यक वनसंरक्षक व प्रकाषष्ठ निष्कासन अधिकारी दादा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधिन वनाधिकारी अग्रिम सैनी (भारतीय वनसेवा), वनपरिक्षेत्राधिकारी रोशन दोनोडे,वनरक्षक मिथुन चव्हाण , विशाल बोराडे पुढील चौकशी करीत आहेत.