अवैधरित्या वाहतूक करून विक्रीसाठी जात असलेला प्रतिबंधित गुटखा, पान मसाला केला जप्त

November 26,2020

यवतमाळ : २६ नोव्हेंबर - पुसद येथील वंसतनगर पो,स्टे अंतर्गत येत असलेल्या रामरहीम नगर येथे कब्रस्तान रोड परिसरात उभ्या असलेल्या चारचाकी टोयाटो काँलीस गाडीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पान मसाला व गुटखा याची अवैद्यरित्या वाहतुक करुन विक्री करण्याकरीता जात असलेला प्रतिबंधीत गुटका मसाला जप्त करण्यात आला. हा गुटखा नांदेड मार्गे येथे आल्याचे बोलल्या जात असुन शहरातील अवैध गुटखा विक्रेते व साठवणूक करणार्या यांची मोठी साखळी मराठवाड्यातील नांदेडला कनेक्ट असल्याचे बोलल्या जात आहे. 

आरोपी जमीर खान अजब खान हा प्रतिबंधित गुटका घेवुन आला असता सदर वाहनाची तपासणी मध्ये प्रतिबंधीत गुटका मिळाला.वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला विमल कंपनीचा गुटका पान मसाला व सुंगधित तंबाखु किंमत १ लाख ५२ हजार १00 रु चा मिळुन आला. टोयाटो काँलीस गाडी ची अं कि ३ लाख ५0 हजार रु असा एकुन ५ लाख २ हजार १00 रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन अन्न व सुरक्षा अधिकारी यांच्या ताब्यात देवुन त्यानी पो.स्टे. वसंतनगर येथे लेखी फिर्याद दिली. ही कार्यवाही स.पो.नि.सुषमा बाविस्कर ,नईम शेख,संजय चव्हाण, विशाल गुल्हाने,सुरेश राठोड,सुभाष काळे इत्यादी कर्मचारी सहकार्य होते.