श्वासनलिकेत अडकलेली हातपिन डॉक्टरांनी अलगद बाहेर काढली

November 26,2020

बुलढाणा : २६ नोव्हेंबर - नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील एक वयोवृद्ध महिला उघड्या हातपिनने दात कोरत असतांना अनावधानाने ती पिण घशात गेली.पुढे ती अन्ननलीकेत फसली. यामुळे यामहिलेला असह्य त्रास होऊ लागला. ही उघडी पिन फुफ्फुस व हृदयात अडकण्याची भिती होती. वेदना असह्य झाल्याने या महिलेला बुलढाणा येथील प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. योगेश गोडे यांच्या डॉ. गोडे हाँस्पीटल ,बस स्टँड जवळ बुलढाणा भरती केले.

डॉ. योगेश गोडे यांनी वेळेत दुर्बीण द्वारे अन्न नलिकेत खोलवर रुतून बसलेली सेफ्टी पिन काढली. तेव्हा महिलेने व त्यांच्या घरच्यांनी सुटकेचा श्वास घेतला. अवघड व नाजूक शस्त्रक्रिया यशस्वी व लवकर पार पाडल्याबद्दल डॉ. योगेश गोडे, डॉ.स्मिता गोडे व भुलतन्ज्ञ डॉ .विजय पाटील यांचे नातेवाईकांनी आभार व्यक्त केले.डॉ. योगेश गोडे यांनी आतापर्यत 60 हजार अवघड शस्त्रक्रिया केल्या आहेत.