दोन कंटेनरची धडक झाल्याने एका ट्रकने घेतला पेट

November 26,2020

यवतमाळ : २६ नोव्हेंबर - पांढरकवडा शहराचे प्रवेशद्वार असलेल्या वाय पॉईंट येथे दोन कंटेनरची समोरासमोर धडक होऊन एका ट्रकने पेट घेतला. परंतु वेळीच अग्निशमन पथक आल्याने मोठी दुर्घटना टळली.

ट्रक क‘मांक एचआर55 डब्ल्यू9978 हा ट्रक नागपूरच्या दिशेने तर एनएल01 एन5782 हा आदिलाबादच्या दिशेने जात होता. वाय पॉईंटवर दुचाकीस्वारास वाचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करताना आदिलाबादकडे जाणार्या ट्रकने आपला ट्रक बाजूच्या दिशेने केला असता नागपूरच्या दिशेने जाणारा ट्रक अतिशय वेगाने असल्याने त्याने ट्रक क‘. 5782 ला जोरदार धडक दिली.

 या अपघातात ट्रकचे डिझेल टँकने फुटून पेट घेतला परंतु वेळीच पांढरकवडा नगर परिषद यांचे अग्निशमन पथकाने आगीवर वेळीच नियंत्रण आणल्याने मोठी दुर्घटना होता होता वाचली. यात एक ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून त्यास उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

 या ठिकाणी नेहमीच अपघात होऊन अनेक व्यक्ती मृत्युमुखी पडल्या असून काहींना अपंगत्व आले आहे. त्यामुळे या ठिकाणी गतीरोधक लावण्याची मागणी होत आहे. या अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने काही वेळ या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.