भररस्त्यावर कारने पेट घेतला

November 26,2020

चंद्रपूर : २६ नोव्हेंबर - पोंभूर्णा शहरातील गोंडपिपरी मार्गावरील चिंतामणी महाविद्यालयासमोर कारने पेट घेतला ही घटना बुधवार, 25 नोव्हेंबर रोजी घडली.

पोंभूर्णा येथून सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या सोमनपूर वळणारवर या कारचा अपघात झाला होता. ही कार चिंतलधाबा येथील विनोद थेरे यांच्या मालकीची होती. या कारला दुसर्या वाहनाने टोचन लावून पोंभूर्णा पोलिस ठाण्यात आणत असताना अपघाग्रस्त कारने पेट घेतला. माहिती मिळताच पोंभूर्णा पोलिस व नगर पंचायतचे मुख्याधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पहिल्यांदाच ‘बर्निग कार’ अनुभवत असल्याने शहरवासियांनी घटनास्थळावर गर्दी केली. दरम्यान, या नागरिकांना पोलिसांनी रोखून धरले. घटनेचा तपास पोंभूर्णा पोलिस करीत आहेत.