म्हणून पवारांनी भाजपऐवजी शिवसेना जवळ केली - प्रियम गांधींचा गौप्यस्फोट

November 26,2020

मुंबई : २६ नोव्हेंबर - भाजपच्या केंद्रीय आणि राज्यस्तरावरील प्रभावी नेत्यांमुळे राज्यतील सरकारमध्ये आपल्या वर्चस्वाला मर्यादा येतील, असे वाटल्याने शरद पवार यांनी भाजपऐवजी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा लेखिका प्रियम गांधी यांनी आपल्या आगामी पुस्तकात केला आहे. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तासंघर्षावरील या पुस्तकात अनेक धक्कादायक दवे करण्यात आले आहेत. 

विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तासंघर्षात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी गेल्या वर्षी २३ नोव्हेंबरला अचानक शपथविधी  घडवून खळबळ उडवून दिली होती. त्यांचे हे सरकार टिकू शकले नाही. त्यानंतर २८ तारखेला महाविकास आघाडीचे सरकार बनले. या सर्व घडामोडीत पडद्यामागे काय घडले, याची उत्सुकता कायम आहे. यासंदर्भात विविध दावेही केल्या जात आहेत. लेखिका प्रियम गांधी यांनी ट्रेडिंग पॉवर या पुस्तकातही काही दवे केले आहेत. या सत्तासंघर्षात  सासर्व घटकांशी बोलूनच आपण पुस्तक बनविल्याचे त्यांचा दावा आहे. २८ तारखेला या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून  त्यापूर्वी त्यातील काही मजकूर बाहेर आला आहे. 

प्रियम गांधी यांच्या पुस्तकातील दाव्यानुसार शरद पवार यांनी भाजपसोबत सरकार बनविण्यासाठी अमित शाह यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली होती.  या बैठकीला देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि युपीए सरकारमध्ये केंद्रात मंत्री राहिलेले  राष्ष्ट्रवादी काँग्रेसमधील एका दिग्गज नेत्याचा समावेश होता. भाजपसोबत वाटाघाटी कार्यवाही हेच दिग्गज  नेते पार पडत होते. या बैठकीत मंत्रिपदापासून सत्तेच्या वाटपाची सर्व सूत्रे निश्चित झाली होती. 

शरद पवार यांनी भाजपला वळसा घालून शिवसेनेशी बोलणी सुरु केली. तेव्हा शरद पवार यांचे राजकारण म्हणजे चित भी मेरी पट भी मेरी असल्याचे विधान अजित पवार यांनी केले. त्यानंतर आपल्या २८ आमदारांसह अजित पवार यांनी भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला. यावर फडणवीस यांनी अजित पवारांसोबत  असलेल्या आंदरांबाबत विचारणा केली असता सुनील शेळके, संदीप क्षीरसागर,राजेंद्र शिंगणे,सुनील भुसार, माणिकराव कोकाटे,दिलीप बनकर, सुनील टिंगरे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे,नरहरी झिरवाळ, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा,नितीन पवार, अनिल पाटील यांच्याशिवाय १३ आणखी अशी आपल्याकडील आमदारांची यादीच अजित पवारांनी वाचून दाखविल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.