नागपूरच्या इंजिनिअर पिता-पुत्रांनी कोरोनाचा संसर्ग टाळून लिफ्ट वापरण्याची नवी पद्धती केली विकसित

November 26,2020

नागपूर : २६ नोव्हेंबर - कोरोनाने  प्रवेश केला आणि त्यानंतर ज्या वस्तूंचा उपयोगाने संसर्ग होऊ शकतो अशा सगळ्याच वस्तुंचा उपयोग बंद करण्यात आला. त्यातच समावेश होता तो म्हणजे मोठ-मोठ्या इमारतींमधील लिफ्टचा. पण या लिफ्टच्या वापर बंद झाल्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत होता. पण अखेर यावर नागपूरच्या इंजिनिअर पिता-पुत्राने उपाय शोधून काढला आहे. आता हात न लावता संसर्गाचा धोका टाळून लिफ्टचा वापर करता येणार आहे.  लिफ्टच्या वापर बंद झाल्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत होता. पण अखेर यावर नागपूरच्या इंजिनिअर पिता-पुत्राने उपाय शोधून काढला आहे.

नागपूरच्या डिप्टी सिग्नल भागातील सुर्यनगर या भागांमध्ये मोठ-मोठ्या इमारती आहेत. अशाच एका इमारतीत सुनील कुमार हेलीवाल हे एक व्यवसायिक राहतात. त्यांनी इंडस्ट्रिअलमध्ये इंजिनिअरिंग केली आहे. त्यांचा मुलगा सुमित कुमार हादेखील सध्या इंजिनिअरिंग करतो. लॉकडाऊनमध्ये सुनिल आणि त्यांच्या मुलांना बराच वेळ घरी सोबत राहायला मिळाला. त्यामुळे या रिकाम्या वेळेत त्यांनी त्यांनी लिफ्टचा उपयोग कसा करता येईल यावर भन्नाट मार्ग काढला.

कोरोनाचा धोका टाळत लिफ्टच्या वापराची त्यांनी युक्ती शोधून काढली. सगळ्यात खास म्हणजे या लिफ्टमध्ये सेंसेर लावण्यात आले आहेत. त्यामुळे 1 ते 2 सेंटीमीटर दूर हात ठेऊन तुम्ही लिफ्टला बोलावू शकता. यानंतर लिफ्टच्या आतमध्ये पायडलच्या मदतीने बटन दाबावं लागेल. यानंतर तुम्हाला जिथे जायचं आहे ते बटन दाबल्यानंतर मॉनिटरवर नंबर दिसतील आणि सूचना येईल. यानंतर लिफ्ट तुम्हाला तुमच्या मजल्यावर सोडेन. 

ही लिफ्ट तयार करण्यासाठी 50 ते 60 हजारांचा खर्च आला. लिफ्ट तयार करण्यासाठी सुनील हेलीवाल यांनी मुंबईवरून कच्चामाल मागवला आणि कामाला सुरुवात केली. हा प्रयोग त्यांनी ज्या बिल्डिंगमध्ये राहतात त्याच बिल्डिंगच्या लिफ्टवर करण्यास सुरुवात केली. तब्बल दीड महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण लिफ्ट तयार करण्यात त्यांना यश आलं. या कामात त्यांनी त्यांच्या मुलाचीदेखील मदत घेतली.

लिफ्टमध्ये असलेल्या बटनाला हात न लावता सेन्सरच्या माध्यमातून लिफ्टशी आपल्याला बोलता येतं तसंच आतमध्ये गेल्यानंतर कोणत्या मजल्यावर जायचं आहे यासाठीही हात न लावता पायडलच्या माध्यमातून तुम्हाला नंबर दाबता येणार आहे. सुनील कुमार यांनी तयार केलेल्या लिफ्टने करोना संक्रमणाचा धोका टळला येणार आहे. त्यामुळे आता अनेक इमारंतीमध्ये या लिफ्टचा वापर करता येऊ शकतो.