बिल्डरला लावला २० लाखाचा चुना

November 26,2020

नागपूर : २६ नोव्हेंबर - एका बिल्डरच्या घरात कुणी सदस्य नसल्याचे हेरून अज्ञात चोरट्याने दाराचे कुलूप तोडून १७ लाख रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा २० लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची  घटना नागपुरात दुपारी घडली.

 संदीप नितनवरे हे बिल्डर आहेत त्यांची पत्नी बाहेरगावी गेली असून दुपारी अडीच च्या सुमारास ते व्यक्तिगत कामाकरिता बाहेर गेले होते ही संधी हेरून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून २० लाख रुपयाचा ऐवज लंपास केला ही घटना नितनवरे बाहेरून घरी आल्यानंतर ४ वाजता उघडकीस आली. लगेच नितनवरे यांनी हुडकेश्वर पोलिसांना या घटनेचीमाहिती दिली. या घटनेची नोंद घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.