वन्यप्राणी बचाव केंद्रातील वन्यप्राणी प्राणी संग्रहालयात स्थानांतरित

November 26,2020

नागपूर : २६ नोव्हेंबर - गोरेवाड्यातील आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय लवकरच सुरू करण्याचा मानस राज्याच्या वनविभागाचा आहे. पंरतु त्याची अंतिम तारीख अजून ठरलेली नाही.आज वन्यप्राणी बचाव केंद्रातून आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात दोन वाघ, सात बिबटे सहा अस्वल स्थानांतरित करण्यात आले आहेत. याच प्रक्रियेंतर्गत आतापर्यंत ‘राजकुमार' नामक वाघ आणि त्याच्या सोबतीला ‘ली' वाघीण तसेच सात बिबट्यांमध्ये दोन नर ५ मद्य सहा अस्वलांमध्ये तीन नार तीन मादी  या प्राण्यांचे स्थानांतरण करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यात गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांना ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राचे अधिकारी देखील हातभार लावत आहेत.

गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधून प्राणी आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयामध्ये स्थानांतरित करण्यात आले आहेत.  हे काम तसे जोखमीमेच आहे. शिवाय या कामासाठी अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांची गरज असते. ट्रान्झिटच्या सगळ्या लोकांना प्राणी पकडणे, त्यांना पिंजऱ्यात टाकणे याचा सराव आहे. केवळ गोरेवाडा प्रशासनाकडून जर हे काम केले गेले असते तर त्यांना हे काम पूर्ण करण्यासाठी बरेच दिवस लागले असते. तेच काम ट्रान्झिटच्या लोकांनी अवघ्या चार-पाच दिवसात करून दाखवले. कुठल्याही प्राण्याला बेशुद्ध न करता सगळ्यांना सुरक्षितरीत्या प्राणिसंग्रहालयात स्थानांतरित करण्यात आले. 

आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय सुरू करण्याआधी गोरेवाड्याला अनुभवी कर्मचाèयांची गरज वेळोवेळी भासणार आहे. अन्यथा एखादा अपघात होऊ शकतो. आज जे लोक कामावर आहेत त्यांना प्राणिसंग्रहालयामध्ये काम करायचा अनुभव कमी आहे. त्या लोकांना आज प्रशिक्षणाची गरज आहे. ट्रान्झिटच्या चमूने पुन्हा एकदा उत्कृष्ट कार्य करीत स्वत:ला सिद्ध केले आहे. ही चमू अनुभवी, आपल्या कामात तरबेज आणि कुठल्याही कार्याला यशस्वी करण्यास सिद्ध असल्याचेच यावरुन लक्षात आले आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्यात हे प्राणिसंग्रहालय सुरू होणार आहे. रेस्क्यू सेंटरमधील हाऊसफूल झालेले पिंजरे आता काही अंशी रिकामे झाले आहेत. दोन नर आणि पाच माद्यांसह सात बिबट आणि सहा अस्वलांना यशस्वीपणे स्थानांतरित करण्यात आले आहे. एकूण सुमारे १५ प्राण्यांचे स्थानांतरण मानद वन्यजीव संरक्षक कुंदन हाते, डॉ. शिरीष उपाध्ये, विभागीय वनाधिकारी प्रमोद पंचभाई यांच्या मार्गदर्शनात झाले.