विभागीय आयुक्त कार्यालयात संविधान दिन साजरा

November 26,2020

नागपूर : २६ नोव्हेंबर -  विभागीय आयुक्त कार्यालयात आज संविधान दिनानिमित्त उपायुक्त अंकुश केदार यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून सर्वत्र  पाळण्यात येतो.

सहाय्यक आयुक्त सुनील निकम, तहसीलदार अरविंद सेलोकर, प्रताप वाघमारे, प्रियदर्शनी बोरकर तसेच  अधिकारी व कर्मचारी यांनी देखील यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिकरित्या वाचन केले.