एनआयटीच्या कार्यालयात संविधान दिन साजरा

November 26,2020

नागपूर : २६ नोव्हेंबर -  नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्य कार्यालयात आज  'भारतीय संविधान दिना'चा ७२वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त नामप्रविप्रा महानगर आयुक्त व नासुप्र सभापती  शीतल तेली-उगले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचन करण्यात आले. यावेळी नामप्राविप्रा'चे अपर आयुक्त  हेमंत पवार, नासुप्र'चे महाव्यवस्थापक व नामप्रविप्रा'च्या नगर रचना विभागाचे उप-संचालक  लांडे, नामप्रविप्रा'चे अधिक्षक अभियंता  लीना उपाध्ये आणि आस्थापना अधिकारी  योगीराज अवदूत तसेच नासुप्र व नामप्रविप्रा'चे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.