पर्यटनासाठी राहुल द्रविड ताडोबात

November 29,2020

नागपूर : २९ नोव्हेंबर -  व्याघ्रदर्शनासाठी प्रसिध्द असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात देशविदेशातील  पर्यटक  नेहमीच येत असतात. येथील पट्टेदार  वाघांनी अनेकांना भुरळ घातली आहे. त्यातच भारतीय क्रिकेटपटू द-वॉल नावाने जगप्रसिद्ध असलेला राहुल द्रविड तसेच  यांनी आज ताडोबाची सफारीचा आनंद घेतला ते बांबू फॉरेस्ट रिसॉर्ट येथे थांबले आहेत. ताडोबा सफारीला आल्याची माहिती मिळताच त्याला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी युवा क्रिकेट प्रेमीनी गर्दी केली. त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी तोबा गर्दी केली.