गायीच्या धक्क्याने युवक पडला विहिरीत

November 29,2020

नागपूर : २९ नोव्हेंबर - गायीला पाणी पाजता-पाजता गायीने धक्का दिल्यामुळे तरुण विहिरीत पडला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील खेड शिवारात दुपारच्या सुमारास घडली.

संजय रामराव पवार (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. संजय नेहमीप्रमाणे आपल्या स्वत:च्या शेतात जागलीला गेला होता. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गायीला पाणी पाजण्यासाठी तो शेजारच्या शेतातील विहिरीवर घेऊन गेला होता. विहिरीवर पोहोचल्यावर गायीने अचानक संजयला जोरदार धक्का दिला. यात संजय विहिरीत पडुन दगाला. याबाबत मृतकाचा भाऊ चरण पवार याने आर्णी पोलिसांत माहिती दिली आहे. संजयच्या पश्चात आई, वडील, आजोबा, एक बहीण असा परिवार आहे. त्याच्याकडे पाच एकर कोरडवाहु शेती आहे. संजय हाच घरातील कर्ता होता. त्यामुळे कुटुंबाचा आधार गेला आहे. मनमिळावू तथा मेहनती तरुण असल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. 

केवळ पाच एकरामध्ये कबाड कष्ट करुन संपुर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह मागविण्याची जबाबदारी संजयच्या खांद्यावर होती. शेतीप्रमाणेच जनावरांवरही त्याचे जीवपाड प्रेम होते. शेतात राखणीसाठी रात्रभर मुक्कामी राहणे आणि जनावरांच्या चारापाण्याची व्यवस्था बघने हा त्याचा नित्याचा रतीब होता. मात्र मुक्या जनावरांना काय कळणार? ज्या गाईच्या पोटापाण्यासाठी संजयने मेहनत घेतली. त्याच गाईच्या किरकोळ चुकीने संजयचा बळी गेला. संजयच्या ध्यानीमनीही नसतांना गाईच्या धक्क्यामुळे त्याचा तोल जावून तो विहिरीत पडला विहिरीला सध्या भरपूर गतप्राण झाला. मेहनती तरुण कळताच खेड गावकर्यांमध्ये तसेच संपुर्ण आर्णी तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.