लव्ह जिहादच्या अध्यादेशाला उत्तर प्रदेशच्या राज्यपालांची मंजुरी
November 29,2020
लखनऊ : २९ नोव्हेंबर - उत्तर प्रदेशात कथित लव्ह जिहाद प्रकरणांविरोधात योगी आदित्यनाथ सरकारच्या अध्यादेशाला राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मंजुरी दिलीय. याचसोबत राज्यात लव्ह जिहाद कायदा लागू झालाय.
राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी बेकायदेशीर पद्धतीनं धर्मांतरण रोखण्याशी निगडीत अध्यादेशाला शनिवारी मंजुरी दिलीय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान राज्यात लव्ह जिहादविरुद्ध कायदा आणण्याचं आश्वासन जनतेला दिलं होतं.
उत्तर प्रदेशात कॅबिनेटनं २४ नोव्हेंबर 'बेकायदेशीर धर्मांतर विधेयका'ला मंजुरी दिली होती. या कायद्याच्या सहाय्याने महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात आलाय.
यापूर्वी मध्य प्रदेश सरकारनं लव्ह जिहाद विरुद्द कायदा आणण्याची तयारी केली होती. हरयाणा, कर्नाटक आणि इतर भाजपशासित राज्यांतही लव्ह जिहादविरुद्ध कायदा आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय.