फरीदाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

November 29,2020

नवी दिल्ली : २९ नोव्हेंबर - अमर कॉलनीमध्ये राहणार्या एका अल्पवयीन मुलीसोबत फरीदाबादमध्ये सामूहिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. २३ नोव्हेंबर रोजी ही अल्पवयीन मुलगी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी फरीदाबादला गेली होती. जेथे प्रियकर आला नाही, मात्र पीडितेचा इन्स्टांग्राम फ्रेंड आपल्या दोन मित्रांसह तेथे पोहोचला. यानंतर त्या तिघांनी जबरदस्तीने पीडितेला एका खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

२४ नोव्हेंबर रोजी पीडिता कशीबशी आरोपींच्या तावडीतून सुटली आणि तिच्या घरी पोहोचली. त्यानंतर तिने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. अमर कॉलनी पोलिस ठाण्यात या अल्पवयीन मुलीवर वैद्यकीय चाचण्यात करण्यात आल्या. बलात्काराची पुष्टी झाल्यानंतर सामूहिक बलात्कार आणि पोक्सो कलमांखाली त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फरीदाबादमध्ये येथे छापा टाकला आणि तिन्ही आरोपींना अटक केली. सध्या पोलिसांनी आरोपींना तुरूंगात पाठविले आहे.

पोलिस अधिकार्यांनी सांगितले की, पीडिता आपल्या कुटुंबासह गढी गावात राहते आणि तेथेच शिक्षण घेत आहे. २३ नोव्हेंबर रोजी अल्पवयी पीडिता आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी फरीदाबादला आली होती. येथे तिचा प्रियकर पोहोचू शकला नाही आणि त्याने तिला घरी जाण्यास सांगितले. मात्र त्याचवेळी पीडितेने आपल्या एका इन्स्टाग्राम मित्राला फोन केला आणि त्याला भेटायला बोलावले. आरोपी शेरदीन (१८), अल्पवयीन मुलीला भेटण्यासाठी आपला मित्र वसीम खान (२२), कासीम खान (२२) यांना सोबत घेऊन पोहोचवा. येथे शरेदीनने अल्पवयीन मुलीला आपल्या गाडीत बसवले. यावेळी गाडीत आधीच वसीम आणि कासीम बसले होते.

अशात मुलीने गाडीत बसण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर तिघांनी जबरदस्तीने तिला गाडीत बसवले आणि बडखल येथे घेऊन गेले. येथे त्यांनी बंद खोलीत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी तिचे हात-पाय बांधून तिला खोलीत सोडून दिले. पीडिता २४ नोव्हेंबर रोजी कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटली. घरी आल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांना याबाबत सांगताच त्यांनी छापेमारी करीत तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे.