दोन भावांचा अपघातात मृत्यू

November 29,2020

अमरावती : २९ नोव्हेंबर - नातेवाईकाच्या लग्नात आलेले दोन सख्खे चुलत भाऊ लग्न समारंभ आटोपून शनिवारी (दि. 28 नोव्हेंबर) रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान दुचाकीने आपल्या कसबेगव्हाण गावी परतत असताना टाकरखेडा मार्गावर सरस्वती नगरलगत नाल्याजवळ अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. रस्त्याने वर्दळ नसल्याचे फायदा घेत अज्ञात वाहनाने पळ काढला.

या अपघातात विनय चरणदास दामले (वय 26 वर्षे) व त्याचा चुलत भाऊ आकाश बाबाराव दामले (वय 23 वर्षे), जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले होते. त्यावेळी विनयचे वडील चारणदास दामले हे त्याच लग्न समारंभातून परत कसबेगव्हाण येथे जाताना त्यांना दोघेही रस्त्यावर पडलेले दिसताच ते हादरले. विनय घटनास्थळीच दगावला तर जखमी आकाशची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयत उपचारयासाठी नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरुन अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.