भाजप नेते करणार घर वापसी - नवाब मलिक

November 29,2020

औरंगाबाद : २९ नोव्हेंबर - 'भाजपचे नेते हे मोठ्या संख्येने काँग्रेस-राष्ट्रवादीत घरवापसी करणार आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेसमधून गेलेले आमदार भाजप सोडण्याच्या मनस्थितीत आहेत, त्यांना टिकवण्यासाठी भाजपकडून ठाकरे सरकार कोसळेल, असं म्हटलं जात आहे. लवकरच काही आमदार हे स्वगृहात प्रवेश करतील आणि त्याबाबत शरद पवार निर्णय घेतील,' असं म्हणत औरंगाबादमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

'महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पूर्ण करणार आहे. कितीही चिठ्ठ्या काढल्या, भविष्यवाणी केली, चकवेगिरी केली तरी हे सरकार पाच वर्षे टिकेल. मोठ्या संख्येने आमदार स्वपक्षी प्रवेश करतील. फडणवीस यांची सरकार पडणार ज्योतिष विद्या खरी नाही हे सिद्ध झाले. पोपट घेऊन चंद्रकांत पाटील चिठ्ठ्या काढत होते. त्या चिठ्ठ्यांची भविष्यवाणी खरी झाली नाही. त्यामुळे चकवेगिरी करण्यासाठी दानवे साहेब समोर आले आहेत,' असं म्हणत नवाब मलिक यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.