रावसाहेब दानवे काही शुद्ध तुपातली आहेत का? बच्चू कडू यांचा सवाल

November 29,2020

अमरावती : २९ नोव्हेंबर - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक  यांच्या घरावर चार दिवसांपूर्वी ईडीने  छापा टाकून सरनाईक यांच्या मुलाची चौकशी सुरू केली आहे. त्यावर भाजप राजकारण करून हेतूपुरस्पर ईडीच्या चौकशी  लावत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. आता यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जोरदार टीका केलीआहे. तुम्ही अनेकांची ईडी चौकशी लावली परंतु भाजपचे रावसाहेब दानवे काही शुद्ध तुपातले आहे का, अशी जोरदार टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. राज्यातील भाजपच्या अनेक नेत्याची ईडीने चौकशी केल्यास मोठं घबाड उघडकीस येईल असही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.

 राज्यात आतापर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची चौकशी लावली आहे. भाजप नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर संपती गोळा केली असून सुद्धा एकाही भाजप नेत्यांवर ईडीची चौकशी लागत नाही. तुम्ही पक्षपातीपणा करत नाही तर मग भाजपच्या एकाही नेत्यावर ईडीची चौकशी का लागत नाही, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.

जो बोलले आवाज उठवेल त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाहीत घटनेची पायमल्ली करण्याच काम केंद्र सरकार कडून होत असल्याचा गंभीर आरोप ही कडू यांनी केला आहे. महाराष्ट्रत लोकशाही ला पूरक अशी परिस्थिती निर्माण करण्याच कुठलही काम केंद्र सरकारकडून होत नाही आहे. अतिशय जुलमी पध्दतीने घटनेची पायमल्ली ही केल्या जात आहे. जो बोलणार त्याचा गळा दाबणार असं काम केंद्र सरकारकडून होत आहे.