माजी आमदार अनिल सोलेंच्या नावे बनावट पोस्ट, पोलिसात तक्रार दाखल

December 01,2020

नागपूर, 1 डिसेंबर: माजी आमदार अनिल सोले यांच्या नावाने सोशल मीडियाचा बनावट पोष्ट टाकून व्हायरल केल्या जात असल्याने भाजपच्यावतीने सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे. याचा तातडीने धडा लावून कारवाई करण्याची  माहणीही केली जात आहे. नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव दिसत असल्याने सोले यांच्या नावाने बनावट पोस्ट टाकून मतदारांची दिशाभूल केली जात आहे. त्यांच्या नावाने बनावट  फेसबूक अकाऊंट उघडण्यात आले आहे. त्यावरून पोस्ट व्हायरल केली जात आहे. सोले नाराजी नाहीत. आतापर्यंत संदीप जोेशी यांचा त्यांनी प्रचार केला. अनेक सभा घेतल्या त्यामुळे महाआघाडीचे उमेदवार नाराज झाले आहेत. पराभव  दिसत असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची खटपट सुरू आहे. काही अतिउत्साही कार्यकर्ते ही पोस्ट अधिकाधिक व्हायरल करीत आहे. सायबर सेलने या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे.