जैवविविधता नष्ट होऊ नये म्हणून जंगल वाचवणे आवश्यक सुरेश प्रभू

December 01,2020

नागपूर, 1 डिसेंबर : जंगल ते जैवविधतेचे घर आहे आणि याच जंगलाचा आपण विध्वंस केला तर जैवविधितादेखील नष्ट होईल. त्यामुळे संपूर्ण निसर्गाचे श्रदय असलेले जंगल वाचवणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन माजी केेंद्रीय मंत्री सुरेश  प्रभू यांनी केले. वनराई फाऊंडेशनच्या वतीने व एव्हीआय फाऊंडेशनच्या सहकार्याने जंगल आणि शेती या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. आज जंगलाची गरज आहे. कारण, पर्यावरणासाठी घातक कार्बन शोधून घेत  ऑक्सिजन सोडण्याची क्षमता त्यात आहे. पाणीच नाही तर औषध वनस्पती पुरवण्याचेही काम जंगल करते. आरोग्यासाठी माणूस पैसे खर्च करून विमा काढतो, पण चांगल्या आरोग्याचा खरा विमा जंगल आहे. असे सुरेश प्रभू म्हणाले.  पर्यावरण आणि शेती या विषयावर बोलताना त्यांनी पाण्याचे स्त्रोत संरक्षित करण्यासाठी निसर्गरक्षक आणि निसर्गशिक्षक नेमायाला हवा. असे सांगितले. 1998 मध्यं पर्यावरण मंत्रालयाची कमान त्यांच्या हातात असता त्यांनी राबवलेल्या  उपक्रमाची माहिती दिली. मानव वन्यजीव संघर्षात माणूस मृत्युमुखी पडल्यानंतर किंवा जखमी झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना भरपाई देणे हा संघर्षावरचा पर्याय नसल्याचे ते म्हणाले. कोरोनाचा संदर्भ देत आजारासाठी प्राण्यांना दोष न देता  माणसांची बदललेली जीवनशैली कोणत्याही आजारासाठी कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिटिशकाळात पहिले वनधोरण आले. पणते वनधोरण जंगलाच्याच विरोधात असल्याचे सुरेश प्रभू म्हणाले. रेल्वेमंत्री असताना रेल्वेला  झालेल्या अपघाताबाबत स्वतःला जबाबदारी ठरवत राजीनामा देण्याचीतयारी त्यांनी दर्शवली, अशी आठवण वनराईचे विश्‍वस्त गिरीश गांधी यांनी सांगितली.