छोट्या व्यापार्‍यांना एमएसएईचा दर्जा द्या नाग विदर्भ चेंबर्सची मागणी

December 01,2020

नागपूर, 1 डिसेंबर :  कोरोनामुळे छोट्या आणि मध्यम आकाराच्या व्यापार्‍यांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असूनही त्यांच्यासाठी असलेल्या सुविधा, योजनांचा तुटवडा आहे. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्र  सरकारने छोट्या आणि मध्यम स्वरुपातील व्यापार्‍यांना एसएसएमईचा दर्जा देऊन सरकारच्या पॅकेजचा लाभ घ्यावा, अशी मागणी अश्‍विन मेहाडिया यांनी केली. विदर्भातील 13 लाख व्यापार्‍यांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या एनव्हीसीसीचा  दिवाळी मिलन आणि उद्योजक व्यापार्‍यांचा सत्कार सोहळा नुकताच झाला. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रमांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.  नितीन राऊत यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी सोलर इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सत्यनारायण नुवाल यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. त्याशिवाय नितिका फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेडचे  संचालक रवलीनसिंग खुराणा यांना विदर्भरत्न पुरस्कार, रोकडे ज्वेलर्सचे संचालक भय्याजी रोकडे, पाटणी ऑटोमाबाईलस्चे संचालक नरेश पाटणी, आहुजा पेन मार्टचे संचालरक ओमप्रकाश आहुजा यांना जीवनगौरव पुरस्कार तर नॅन्सी  जायस्वाल य ना युवा मनहिला उद्योजिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मेहाडिया म्हणाले, जीएसटी पोर्टलच्या चोवीस तास सेवेची कनेक्टिव्हिटी दीड लाखावरून पाच लाक युझर्सपर्यंत  वाढवायला हवी. शेजारी राज्यांप्रमाणे  वीजदर कमी व्हायला हवेत. जेणेकरून व्यापारी वर्गाला दिलासा मिळू शकेल.