दोन ट्रकच्या धडकेत चालक ठार

December 01,2020

यवतमाळ, 1 डिसेंबर : भरधाव वेगातील दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघतात चालक ठार झाला. ही घटना पिंपळखुटी ते पिंपळखुटी चेकपोेस्टदरम्यान घडली.  रवी गोरान्तला असे मृतकाचे नाव आहे. तसेच अपघातात  गंभीर झालेल्या तिघांना उपचारासाठी आदिलाबाद हलविण्यात आले आहे. ट्रकमध्ये मृतक रायचूर येथून सोयाबीन घेऊन जात होता. पिंपळखुटी येथील रेल्वेपुलाचे काम सुरू असल्याने या एकाच मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. पहाटे  दोन वाजताच्या सुमारास मृतक ट्रक घेऊन जात असताना विरुद्ध दिशेने येणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात चालक रवीचा जागीच मृत्यू झाला. तसेच ट्रक क्लिनर आकूला रेड्डठी याच्या डोक्याला दुखापत झाली.  पाटणबोरी, पांढरकवडा पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने ट्रकला काढण्यात आले. व मृतक चालकाचा मृतदेह बाहेर काढला. दोन्ही ट्रकमनधील जखमींना उपचारासाठी आदिलाबाद येथे नेण्यात आले.