काँग्रेस पक्ष शेतकर्‍यांना भ्रमित करीत आहे पंतप्रधान

December 01,2020

वाराणसी, 1 डिसेंबर : नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकर्‍यांना नवनवे पर्याय मिळणार असल्याने आपली दुकानदारी बंद होईल याची माहिती असल्याने विरोधक विशेषतः काँग्रेस पक्ष शेतकर्‍यांना भ्रमीत करीत असल्याचा स्पष्ट आरोप पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी केला. केंद्र सरकारने संसदेत पारित केलेले कृषी कायदे ऐतिहासिक हेत. यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात फायदे मिळणार असल्याने विरोधक निराश झाले आहेत. सरकारने कायदे तयारकरणे आणि त्यास विरोध होणे,  ही बीाब स्वाभाविक आहे. लोकशाहीचा हा एक भाग आहे. मात्र, ज्यांनी आजपर्यंत शेतकर्‍यांसोबत न्याय केला. तेच आता त्यांच्या मनात भविष्याची भीती निर्माण करीत आहेत. आज नाही तर भविष्यात तुमच्यासाठी हे कायदे कसे धोकादायक  आहेत. असे सांगून त्याची दिशाभूल केली जात आहे. सरकारच्या कायद्यांना विरोध करा पण भ्रम निर्माण करू नका. असे पंतप्रधांनानी येथे एका जाहीर सभेला संबोधित करतांना सांगितले. केंद्र सरकारच्या प्रत्येकच  कायद्याविरोधात विरोधी पक्ष समाजाची दिशाभूल करीत आहे. मागील काही वर्षांच्या काळात असे अनेक प्रकार आपण बघितले आहेत.

यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत ज्या दंगली उसळल्या. त्या देखील विरोधकांच्या याच कटकारस्थानाचा भाग होत्या. आपल्या सत्ताकाळात शेतकरी व समाजासाठी कधीच चांगले न करणारे हे विरोधी पक्ष नवनवीन क्ल्प्तया करून  त्यांच्या मनात द्वेष निर्माण करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. याच विरोधकांनी आधी किमान हमी भाव, कर्जमाफी आणि खत सबसिडी आदी योजनांच्या नावाखाली शेतकर्‍यांनी फसवणूक केली होती. कित्येक वर्षांपासून शेतकर्‍यांची  दिशाभूल केली जात आहे. आज माझे सरकार त्याच्यासाठी अनेक चांगले निर्णय घेत असल्याचे त्यांना पाहावत नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी योजना आणण्यात आल्या, कृषी कायदे तयार करून  बाजारपेठांमधून दलालांचे कायमचे उच्चाटन करण्यात आल्याने विरोधक निराश झाले आहेत.