आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आंदोलन करू शेतकरी नेत्यांचा निर्धार

December 01,2020

नवी दिल्ली, 1 डिसेंबर : आम्ही येथे आरपारच्या लढाईसाठी आलो आहोत. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार नाही. कितीही दिवस आंदोलन करण्याची आमची तयारी आहे. असा निर्धार दिल्लीच्या सीमेवर मागील  पाच दिवसांपासून ठिय्या आंदोलन करीत असलेल्या शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला. दिल्लीला लागून असलेल्या सिंधू सीमेवर पत्रपरिषदेला संबोधित करताना या नेत्यांनी सांगिज्ञकतले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्यात मन की बात  कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधतात. पण आमच्या मनातले त्यांना ओळखता येत नाही. आमच्या मागण्या विनाअट आणि कुठलीही चर्चा न करता मान्य कराव्या, एवढेच आम्हाला सांगायचे आहे असे न झाल्यास केंद्र सरकार आणि  भाजपाला मोठी किंमत चुकवावी लागेल. आपल्या ह क्कासाठी आंदोलन करीत असलेल्या शेतकर्‍यांविरोधात विविध प्रकारचे 31 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आमच्याविरोधात काय करायचे. ते करा, आता आम्ही मागे हटणार नाही.  आरपारची लढाई होईलच, असा इशाराही या नेत्यांनी दिला.

दरम्यान दिल्लीच्या सीमेवर आंदोलक शेतकर्‍यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दिल्लीकडे येणारे सर्व पाचही मार्ग बंद करण्याची धमकी आंदोलकांनी दिली असल्याने पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. सध्या सिंदू आणि टिकरी  सीमेवर शेतकर्‍याचे शांततापूर्ण आंदोलन सुरू असून तिथे पंजाबमधून आज शेकडो शेतकरी नव्याने दाखल झाले आहेत. काही शेतकरी बुराडी मैदानावरही निषेध आंदोलन करीत आहेत.