नोकरी न मिळाल्याने कविता राऊत राज्यपालांना शरण

December 01,2020

नाशिक, 1 डिसेंबर : सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतने न्याय मिळावा म्हणून राज्यपालांकडे धाव घेतली आहे. नोकरीसंदर्भात होत असलेल्या अन्यायाची कैफियत कविताने राज्यपाल  भगतसिंह कोशियारींपुढे मांडली आहे. 2014 पासून वर्ग 1च्या पदासाठी शासकीय सेवेत नोकरी मिळावी म्हणून कविता राऊतने अर्ज केला होता. मात्र कवितानंतर अर्ज केलेल्या काही खेळाडूंची वर्ग 1 च्या पदासाठी शासकीय सेवेत नियुक्ती  झाली असून ती मात्र अद्यपही नोकरीच्या प्रतीक्षेतच आहे. शासकीय नोकरी मिळण्यासाठी विलंब होत असल्यामुळे निराश झालेल्या कविता राऊतने माध्यमां संवाद साधला ती म्हणाली, 2014 पासून वर्ग एकच्या पदासाठी अर्ज केलली फाईल  अद्याप प्रक्रियेतच आहे. मी वेळोवेळी पाठपुरावा करूनही अद्याप मला न्याय मिळालेला नाही. सध्या ओएनजीसीमध्ये डेहराडूनला माझी नियुक्ती करण्यात आली आहे. मी ग्रामीण भागात लहानाची मोठी झाले आहे. आणि ग्रामीण भागातील  खेळाडूंया समस्या माझ्यापेक्षा जास्त कोणाला समजू शकत नाहीत. मला महाराष्ट्रासाठी माझ्या ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी काय करायचे आहे हाच विचार समोर ठेवून मी अर्ज केला होता. पण अद्यापही मला न्याय  मिळालेला नाही.  माझ्यानंतर अर्ज केलेल्या खेळाडूंना नियुक्ती मिळाली आहे. परंतु, मला अद्यपही न्याय मिळालेला नाही. यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि ते अद्याप सुरुच आहेत.यामध्ये मला अनेक मंत्र्यांनीही मदत केली. पण तरी काम न झाल्यामुळे माझे  कुठे चुकलयं किंवा मी खेळात कुठे कमी पडेलय का? से प्रश्‍न माझ्यासमोर उभे राहिले आहे, असे कविताने सांगितले. राज्यपालांना भेटणे हा माझ्यासमोरचा शेवटचा पर्याय होता. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून माझ्या कामात  अडचणी येत आहेत. माझी फाईल तिथून पुढे सरकतच नाही. असेही ती म्हणाली. 2018 मध्ये ज्या 33 खेळाडूंची यादी जाहीर झाली होती. त्यातही माझे नाव नव्हते, असेही तिने यावेळी सांगितले.