आज भाजपची सत्ता असती तर जयंत पाटील भाजपचे मंत्री राहिले असते -नारायण राणे यांचा दावा

December 01,2020

रत्नागिरी, 1 डिसेंबर : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्यावर टीका केली आहे. पण ती आपण मनावर घेत नाही. कारण ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाच्या नेतृत्वांशी ते प्रामाणिक नाहीत जर आता भाजपची सत्ता असती तर ते  भाजपकडून मंत्री झाले असते, असा दावा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी एका पत्रकारपरिषदेत केला. सध्या राणे आणि जयंत पाटील यांच्यात चांगलेच वाग्युद्ध रंगले आहे. राणे यांनी यापूर्वी केलेल्या टिकेला उत्तर देतांना पाटील यांनी  राणेंना गंजलेल्या तोफेची उपमा दिली होती. त्यावर पलटवार करत पाटीलयांच्या पक्षनिष्ठेवरच राणेनी प्रश्‍न उपस्थित करत ते बाजपच्या वाटेवर होते, असा सनसनाटी गौफ्यस्फोट केला. शिवाय, आपण इस्लामपुरात जाऊन त्यांचा भांडाफोड  करू, असा इशाराही दिला. राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या पायगुणाने कोरोना आला. आरोग्य, शिक्षण, शेतकर्‍यांना मदत यासरख्या सर्वच विषयांमध्ये राज्य सरकार अपयशी झाले आहरे.  आपल्या सरकारने वर्षपूर्ती केल्याची मुलाखत देताना वर्षभरात सरकारने काय ठोस केले, याची माहितीही मुख्यमंत्री देऊ शकत नाहीत. कोरोनावरील उपाययोजनांसाठी सरकारने 12 हजार कोटी खर्च  केल्याचे मुख्यमंत्री सांगतात. त्यातील  असंख्य कामे आपल्याच नातेवाईकांना देऊन सरकारे तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोपही राणेनी केला.