आरक्षण मुद्यावरून भाजप मराठा समाजात फूट पाडते आहे आ. शशीकांत शिंदे

December 01,2020

सातारा, 1 डिसेंबर :  मराठा आरक्षणाचा राज्य सरकार ठाम असून, सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे    बाजू मांडत आहे. या प्रश्‍नावरून मराठा समाजात फूट पाडण्याचा डाव बाजपकडून        ळलाजात आहे,असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे    नेते आमदार शशीकांत शिंदे यांनी    एका पत्रकार परिषदेत केला.    खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारवर प्रत्यक्षपणे तर शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती.  या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही सर्वपक्षीयांची भावना आहे. मात्र, लोकांमध्ये बुद्धिभेद करून समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस,चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसलेहे राज्य सरकारवर आरोप करत आहेत. वास्तविक, राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आह. न्यायालयातही भक्कपणे बाजू मांडण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात अर्णव  गोस्वामीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असेल,तर मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नही सर्वोच्च न्यायालयाला केंद्र सरकारने सुचूना कराव्यात यासाठी राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणावा. आरक्षणप्रश्‍नी काही लोकांना पुढे  करून भाजप राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने सहकारी संस्था मोडीत काढण्याचे काम केले. वास्तविक मराठा समाज गेल्या पाच वर्षात एक झाला आणि त्यांनी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला.  त्यामुळरे या आरक्षणाला कोमाला दोषी धरणे योग्य होणार नाही.